N.M. College मध्ये NCC कॅडेट्सना सायबर सुरक्षेचे धडे
1 min read
N.M. College मध्ये NCC कॅडेट्सना सायबर सुरक्षेचे धडे
जळगाव येथील N.M. College मध्ये NCC कॅडेट्ससाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात Cyber Warriors विद्या सोनवणे, साक्षी तानाजी पाटील, राहुल चोपडे आणि जय ठाकूर यांनी कॅडेट्सना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध सायबर फसवणुकीच्या प्रकारांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी OTP फ्रॉड, फिशिंग, फेक कॉल व मेसेज, संशयास्पद लिंक, बनावट वेबसाइट व ॲप्स, सोशल मीडिया फसवणूक तसेच ऑनलाइन पेमेंट फ्रॉड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. OTP, PIN, CVV, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
तसेच Quick Heal Foundation Anti Fraud App ची माहिती देऊन NCC कॅडेट्सकडून ॲप activation करून घेण्यात आले. या उपक्रमात Field Project Volunteers भारती पाटील आणि कल्पेश पाटील यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाला डॉ. आर. बी. आमले यांचे मार्गदर्शन लाभले.


