नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9412807565,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें
August 12, 2026

Suraj Kesari

No.1 Digital News Channel of India

विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जागरूकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम

1 min read

विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जागरूकता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम; बुकलेट्सचे वाटप

जामनेर : विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांची माहिती देऊन सुरक्षित डिजिटल वापराची सवय निर्माण करण्याच्या उद्देशाने इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल, जामनेरपुरा येथे विशेष सायबर अवेअरनेस सेशन घेण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील विविध धोके आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय समजावून सांगण्यात आले.

जान्हवी सपकाळे, वैष्णवी सैतवाल, साक्षी पाटील, विद्या सोनवने, राहुल चोपडे आणि जय ठाकूर या सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धती ओळखणे, संशयास्पद कॉल किंवा मेसेजपासून सावध राहणे आणि ऑनलाइन माहिती शेअर करताना आवश्यक खबरदारी घेणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान Quick Field Foundation कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायबर अवेअरनेस बुकलेट्सचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. बुकलेट्समधील माहिती विद्यार्थ्यांना वाचून समजून घेता यावी यासाठी प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आला. पुस्तिकेतील माहिती घरातील इतर सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना जबाबदारीने वागावे, अनोळखी व्यक्तींशी संवेदनशील माहिती शेअर करू नये, OTP व पासवर्ड सुरक्षित ठेवावेत आणि कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन व्यवहाराची पडताळणी करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले. फसवणुकीच्या आमिषाला बळी न पडता प्रत्येक डिजिटल व्यवहारात सतर्कता ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.

प्राचार्य गायकवाड सर यांच्या सहकार्याने आणि आर. बी. आमले सरांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली जागरूकता त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्यास या जनजागृती उपक्रमाचा प्रभाव अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

Right Menu Icon